जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा सामना रंगला.pudhari file photo
Published on
:
23 Nov 2024, 11:25 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:25 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये अकरावी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती व महाआघाडी यांच्यात तर प्रमुख लढत होती. त्याबरोबरच अपक्षांनीही पक्षाच्या उमेदवारांना आव्हान दिले होते. मात्र यामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी सर्वांना मागे पाडले आहे. महायुतीने आपला विजयाचा झेंडा रोवला आहे. तर काँग्रेसचे एकमेव उमेदवार असलेले रावेर विधानसभा ही पुन्हा भाजपाने आपल्या ताब्यात घेतली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर या मुख्य लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, जामनेर, पाचोरा व मुक्ताईनगर याकडे मतदारांचे लक्ष लागून होते. या लढतीमध्ये काय होणार? मतमोजणी सुरु होताच महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यामध्ये विद्यमानांनी विजय मिळवून सर्व अफवांना अपवाद ठरविले, तर जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मधून अमोल जावळे यांनी शिरीष चौधरी यांचे सुपुत्र पहिल्यांदा रिंगणात उतरणारे धनंजय चौधरी व प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांच्यामुळे हरिभाऊ जावळे यांचा पराभव झाला आहे
जळगाव शहर या ठिकाणी विद्यमान आमदार यांनी माजी महापौर जयश्री महाजन यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला आहे. तसेच बंडखोर अपक्ष उमेदवारांचाही दारुण पराभव केला आहे.
जळगाव ग्रामीण मध्ये आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये सरळ लढत होती. या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर याचा पराभव केला आहे.
चाळीसगाव मध्ये भाजपा मंगेश चव्हाण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेश पाटील यांचा दारुण पराभव केला.
पाचोर्यात शिंदे सेनेचे किशोर पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वैशाली पाटील यांचा पराभव केला
जामनेर या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. या लढतीत सहा वेळा विजेते गिरीश महाजन यांनी सातव्यांदा विजय नोंदवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्राध्यापक दिलीप खोडपे यांचा पराभव केला आहे.
तर मुक्ताईनगरमध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांचा दारुण पराभव केला आहे.