जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा सामना रंगला.pudhari file photo
Published on
:
20 Nov 2024, 4:42 am
Updated on
:
20 Nov 2024, 4:42 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवार (दि.20) सकाळी सात वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. यावेळी काही मत जळगाव व जामनेर या ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड आल्यामुळे काही वेळ मतदान थांबवण्यात आले होते. सर्वाधिक मतदान हे रावेर मतदार संघात 9.25 टक्के तर सर्वात कमी मतदान हे पाचोरा 2.89 टक्के झाले आहे
सकाळी 7 ते 9 पर्यंत झालेले मतदान असे..
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सकाळी 7 ते 9 यावेळी मतदानाला प्रारंभ झाला या दोन तासांमध्ये सर्वाधिक मतदान हे रावेर विधानसभेमध्ये झाले ते सर्वाधिक कमी पाचोरा विधानसभेमध्ये झालेले आहेत
अमळनेर 4.30 टक्के
भुसावळ 5.95 टक्के
चाळीसगाव 5.91 टक्के
चोपडा 5.86 टक्के
एरंडोल 4.73 टक्के
जळगाव शहर 6 37 टक्के
जळगाव ग्रामीण 6 78 टक्के
जामनेर 5.74 टक्के
मुक्ताईनगर 6.54 टक्के
पाचोरा 2.89 टक्के
रावेर 9.25 टक्के