यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ निवडणुक कर्तव्यावर जाणाऱ्या वाहनाला अपघात झालाPudhari News Network
Published on
:
19 Nov 2024, 7:50 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:50 am
जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ झालेल्या एका चारचाकी वाहनाच्या अपघातात निवडणुकीत प्रशासकीय कर्तव्यावर कार्य करण्यासाठी जाणाऱ्या शासकीय कर्मचारी महीलांचे वाहन अनियंत्रीत होवुन झालेल्या अपघातात चार महिला शिक्षीका व कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.
जखमी महिलांना उपचारासाठी चोपडा येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. किनगाव तालुका यावल येथील कृषी उत्पन्न बाजारच्या उपकार्यालयासमोर सोमवार (दि.18) रोजी ज्योती भादले, मिनाक्षी सुलताने, आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक कार्यरत असलेल्या कविता बाविस्कर व शिक्षिका लतिका परवीन तडवी या चोपडा येथे निवडणूक कर्तव्यावर रवाना झाल्या. चारचाकी वाहन (क्रमांक एमएच 03 बिजे 8253) या वाहनास चोपडयाकडून रावेर येथे निवडणुकीच्या प्रशासकीय जातांना मंगळवार (दि.19) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास वाहनचालकाकडून ताबा सुटल्याने चारचाकी अनियंत्रीत झाल्याने अपघात घडला. त्यामुळे वाहनात बसलेल्या मिनाक्षी सुलताने, शिक्षीका ज्योती भादले, शिक्षीका लतिका परवीन तडवी व ग्रामसेविका कविता बाविस्कर या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदती तत्काळ किनगाव येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथील पाठविण्यात आले आहे.