पाल गावात टेम्पोच्या धडकेत तरूणासह चार बैल ठार झाले.File photo
Published on
:
27 Sep 2024, 5:26 pm
Updated on
:
27 Sep 2024, 5:26 pm
जळगाव : बैल घेऊन जाणाऱ्या पदचाऱ्याला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात तरूणासह त्याचे चार बैल ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२७) रावेर तालुक्यातील पाल रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख फिरोज शेख गंभीर (वय ३२) असे अपघातातील मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथे हल्ली मुक्काम असलेला शेख फिरोज शेख गंभीर ( मूळ रा. बऱ्हाणपूर) नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाल येथून रावेर येथे शुक्रवारच्या बैल बाजारात बैलांची विक्री करण्यासाठी पायी जात होता. त्यावेळी एका पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने येणारी आयशर टेम्पो (क्र एम एच १९ झेड ५२८५) ने जोरदार धडक दिली. यामध्ये चार बैलांसह फिरोज याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक फरारी झाला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत.