महायुती Vs महाआघाडीPudhari News network
Published on
:
23 Nov 2024, 11:38 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:38 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये झालेल्या लढतीत महायुतीने 100 टक्के यश मिळवले आहे. तर आघाडीला आपले एकही खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर महायुतीचा वर्चस्व निर्माण झालेले आहेत. जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेवर पुन्हा महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांवर महायुतीने शंभर टक्के यश मिळवलेले आहे. त्यामुळे आघाडीला जळगाव जिल्ह्यातून एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यात सुपडे साफ झालेले आहे. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी प्रचाराची धुरा हातात घेऊनही त्यांना मुक्ताईनगरमध्ये यश मिळालेले नाही.
तर रावेर मधील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जात होते, मात्र भाजपाच्या उमेदवाराने रावेर विधानसभा क्षेत्र पुन्हा भाजपाने राखला आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने जळगाव लोकसभेमध्ये आमचे वर्चस्व असल्याचा दावा केला होता, मात्र जळगाव लोकसभेतील असलेल्या चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव शहर व जळगाव ग्रामीण एकही ठिकाणी महाआघाडीच्या उमेदवाराला विजय खेचून आणता आलेला नाही.
रावेर लोकसभा मतदारसंघातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराने विजय नोंदविला आहे. रावेर हा महाआघाडीच्या उमेदवाराकडे असलेला मतदारसंघ पुन्हा महायुतीकडे आणण्यात यश आले आहे.