Published on
:
29 Nov 2024, 10:40 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:40 am
जालना, पुढारी वृत्तसेवा ; न्यायालयातील काम आटोपून बाहेर येणार्या विधिज्ञ शैलेश जोशी यांच्या वाहनाला (एमएच १२ डब्ल्यू यू ३८५८) ऑटो चालकाने हुलकाविणी दिल्याने विधिज्ञ यांची कार उभ्या असलेल्या वाहनाला धडकली. यानंतर विधिज्ञ यांची कार खड्यात पडली. यात विधिज्ञ व त्यांचा सहकारी किरकोळ जखमी झाला आहे.
शहरातीलच एक कार (एमएच २१ सीए ५५५२) ही चार चाकी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास न्यायालयासमोरच असलेल्या प्रवेश द्वाराच्या बाजूला मुख्य रस्त्यावर उभी होती. त्याच दरम्यान न्यायालयातून आपले काम आटोपून विधिज्ञ शैलेश जोशी हे (एमएच १२ डब्ल्यू यू ३८५८) या थार कंपनीच्या वाहनातून बाहेर आले.
दरम्यान प्रवेशद्वारातून वाहन वळवत असताना समोरून आलेल्या एका ऑटो रिक्षाने हुलकावणी दिल्यामुळे वकिलाची गाडी याच रस्त्यावर उभी असलेल्या एर्टिगाला मागून भिडली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये जाऊन पडली.
सुदैवाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी लगेचच या वाहनात अडकलेले वकील शैलेश जोशी आणि त्यांचे सहकारी सुभाष काळे यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात भरती केले आहे. या अपघातात ते जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात भरती केले.