Published on
:
19 Nov 2024, 2:02 pm
Updated on
:
19 Nov 2024, 2:02 pm
वडीगोद्री : मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा. वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल असे न करता तुमचे कष्ट डोळ्यासमोर समोर ठेवा. तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, मी लोकसभेला सांगितले होते, कोणाला पाडायचे त्याला पाडा आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, विधानसभेला पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम पाठवली नाही. मी महाराष्ट्रमधील कोणत्याही मतदार संघातील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.(Maharashtra assembly poll)
ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडू नका
मराठ्यांनी एकजुटीने १०० टक्के मतदान करा. पण ज्यांनी आरक्षणाला विरोध केला आहे. त्यांना सोडू नका. राजकारणापेक्षा मला आरक्षण महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणार आहे. मराठ्यांनी संभ्रम ठेवू नये. मी कोणालाही काही सांगितले नाही आणि शेवटपर्यंत सांगणार नाही. कोणाचेही सरकार आले तर आपल्याला लढावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंचे कालीचरण महाराज यांना प्रत्युत्तर
आरक्षण आणि बाबांचा काय संबंध येतो. या बाबाचे बरच कुटाने आहेत. बाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे, हे त्यांचं काम आहे. आरक्षण काय हे शिकवण त्यांचं काम नाही. हा विचित्र प्राणी आहे. तू का बाबा आहे का हेंद्र्या? माझ्या आई बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा तू कुठे गेला होता? हा टिकल्या, गंध लावतो.नथ घालतो असे म्हणत मनोज जरांगें यांनी कालीचरण महाराज यांना प्रत्युत्तर दिले.(Maharashtra assembly poll)
हिंदू धर्मावर ज्यावेळी संकट येतं. तेव्हा आम्ही समोर येतो. तुला मी कधी बोललो नाही. तू वर आणि खाली वेगळा दिसतो. तुला कधी मी बोललो नाही. बाबा तुला आमचं दुःख कळायचं नाही. तुम्ही पाकिटं घेऊन किर्तनं करता, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. गरिबांच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतं ते विचार, हिंदूत अर्धा एकटा मराठा आहे. तू सुपारी घेतली असेल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे.
आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो तू कोणतं हिंदुत्व चालवतो. तू आतून काही घालतो की नाही हे लोकांना माहीत नाही. तुला काय अक्कल आहे का रे? कालीचरण हा सपाट दिसतो वरून खालपर्यंत. सरकारने हे असले संत कुठून प्रचाराला आणलेत. हिंदू असूनही का मराठ्यांच्या पोराला मारायला निघालेत? तुला मराठ्यांचा तिरस्कार का आहे? पक्षाला बदनाम करण्यासाठी तू आम्हाला बदनाम करतो का? असे म्हणत मनोज जरांगे यांनी कालीचरण महाराजांची नक्कल केली.(Maharashtra assembly poll)
प्रत्येक पाच वर्षाला आमच्या वाटेला 'हेच'
सत्तेत होते तोवर का दिल नाही.आता आमच्यासमोर सामूहिक आरक्षणाची लढाई आहे गोड बोलणं भावनिक बोलणं हेच माझ्या समाजाच्या वाटेला आलं आहे. प्रत्येक पाच वर्षाला आमच्या वाटेला हेच आलं आहे. माझ्या समाजाला काहीही मिळालेलं नाही असे मनोज जरांगे नरेंद्र पाटील यांच्या आम्ही सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू या वक्तव्यावर बोलत होते.
आमच्या आरक्षणाच काय.?मेटे,वडजे,अण्णासाहेब पाटील यांच बलिदान गेलं,त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे,खरे बलिदान ४५० पोरांचे आहे.ते मी वाया जाऊ देणार नाही,मराठ्यांच्या डोक्यात आता कोणताही संभ्रम नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.(Maharashtra assembly poll)