जितेंद्र आव्हाड CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला 'वर्षा'वर:सामंत म्हणाले - राजकारणात मैत्री करण्यावर आचारसंहिता नाही

1 hour ago 1
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांत कोणती चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. पण यामु्ळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. या भेटीवर शिवसेना नेते उदय सामंत यांनी भाष्य केले. राजकारणात कुणी कुणाशी मैत्री करावी यावर कोणतीही आचारसंहिता नाही, असे सूचक विधान सामंत यांनी केले. अमित शहा यांच्या सूचनेनुसार आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार होती. पण ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. ही बैठक रद्द होणे आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चर्चांना उधाण आले आहे. आव्हाड-शिंदेंच्या भेटीवर सामंतांची प्रतिक्रिया दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कुणी कुणाशी मैत्री करावी यावर कोणतीही आचारसंहिता नाही, असे सूचक विधान सामंत यांनी केले. जितेंद्र आव्हाड व शिंदे हे दोन्ही नेते ठाण्याचे आहेत. त्यांच्यात चांगली मैत्रीही आहे. त्यामुळे ते एकमेकांना भेटले असावेत. आव्हाड यांना शिंदेंसोबत यायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे. पण ते सोबत येतील, असे वाटत नाही, असेही सामंत यांनी म्हटले. यापूर्वीही घेतली होती शिंदेंची भेट जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा आव्हाड यांची शिंदेची भेट घेतली. दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. हे ही वाचा... मुस्लीमबहुल पट्ट्यात महायुतीचे वारे:राज्यात 38 पैकी 21 मतदारसंघात मिळाले यश; एकट्या भाजपने 14 जागा जिंकल्या राज्यात 20 टक्केंपेक्षा जास्त मुस्लीम मतदार असलेल्या 38 मतदारसंघामध्ये महायुतीने मुसंडी मारल्याचे समोर आले आहे. यातल्या 21 जागा महायुतीने पटकावल्यात. त्यातही 14 जागा भाजपने जिंकल्यात. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत मुस्लीमबहुल भागात भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. त्यात यंदा 3 जागांची वाढ झाल्याचे दिसते. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article