जिल्ह्यात आज मतदान; प्रशासन सज्ज

3 days ago 2

रत्नागिरी : मतदानयंत्रांसह सामग्री ताब्यात दिल्यानंतर कर्मचार्‍यांना त्यांच्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी मतदारसंंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई आदी. pudhari photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Nov 2024, 1:00 am

Updated on

20 Nov 2024, 1:00 am

रत्नागिरी : राज्याची विधानसभेची निवडणूक उद्या, बुधवारी होत असून, रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांतील 1,747 मतदान केंद्रांवर 13 लाख 39 हजार 697 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात नवतरुणांसह वृद्ध मतदारांची संख्याही मोठी आहे. प्रशासनाने जास्तीत मतदान व्हावे, यासाठी अगदी ग्रामीण भागांपर्यंत मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. जिल्ह्यात 1,747 विधानसभा मतदान केंद्र असून, यात दापोलीत 392, गुहागर 322, चिपळूण 336, रत्नागिरी 352, राजापूर 345 मतदान केंद्रे आहेत. यातील शहरीभागात 184 तर ग्रामीण भागात 1,563 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

दापोलीमध्ये 2 लाख 91 हजार 297 मतदार असून, यात 1 लाख 39 हजार 895 पुरुष तर 1 लाख 51 हजार 402 महिला मतदार आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 42 हजार 704 एकूण मतदार असून, त्यात 1 लाख 15 हजार 511 पुरुष तर 1 लाख 27 हजार 193 महिला मतदार आहेत. चिपळूण मतदारसंघात 1 लाख 34 हजार 883 पुरुष तर 1 लाख 41 हजार 183 महिला असे 2 लाख 76 हजार 66 एकूण मतदार आहेत. रत्नागिरी मतदारसंघात 1 लाख 42 हजार 48 पुरुष तर 1 लाख 49 हजार 162 महिला अशा 2 लाख 91 हजार 221 एकूण मतदार आहेत.

राजापूर मतदारसंघात 2 लाख 38 हजार 409 एकूण मतदार असून यात 1 लाख 13 हजार 839 पुरुष तर 1 लाख 24 हजार 570 महिला मतदार आहेत. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 11 तृतीयपंथी मतदार आहेत.

जिल्ह्यात 24 हजार 589 नवमतदार असून ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नवतरुणांमध्ये बुधवारी होणार्‍या मतदानाबाबत उत्साह दिसत आहे. जिल्ह्यात शंभर वयावरील 394 मतदारांची नोंद प्रशासनाने केली आहे. यातही 110 वर्षापेक्षा अधिक वयाची एक महिला मतदाराची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 7 हजार 201 दिव्यांग उमेदवारांची नोंद आहे. सर्वाधिक दिव्यांग उमेदवारांची नोंद चिपळूणमध्ये आहे.

पाचही उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती

जिल्ह्यात 13 लाख 39 हजार 697 एकूण मतदार असून, यात पुरुष मतदार 6 लाख 46 हजार 176 आहेत; तर 6 लाख 93 हजार 510 इतक्या महिला मतदार आहेत. पाच विधानसभा मतदारसंघांत मिळून 47 हजारहून अधिक महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात आठ ते अकरा हजार इतक्या महिला अधिक आहेत. त्यामुळे पाचही ठिकाणी महिलाच उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

गणेशखिंड येथे 95 हजारांची रोकड जप्त

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत चिपळूण-गुहागर मार्गावरील गणेशखिंड येथे निवडणूक गस्ती पथकाला 95 हजारांची रक्कम सापडली आहे. नितीन बेलवलकर यांच्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली. गणेशखिंड पथकप्रमुख रोहित गवस यांनी ही रक्कम जप्त केली आहे. दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. या बाबत अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article