काळ बदलतो तशा काही गोष्टीही बदलतात. माणूस आधुनिक गोष्टींचा अधिकाधिक वापर करतो. आता हेच पाहा ना आपण पूर्वी जमिनीवर बसून जेवायचो. आता डायनिंग टेबलचा जमाना आहे. लोक डायनिंग टेबल किंवा सोफ्यावर बसून टीव्ही पाहत पाहत नाश्ता वा जेवण करतात. त्यांचं बघून घरातील छोट्यांनाही तीच सवय लागली आहे. त्यामुळे जमिनीवर बसून जेवण्याची परंपराच जणू काही मोडीत निघाल्यासारखं दिसतं. डायनिंग टेबलवर बसून आराम के साथ जेवता येतं असं तुम्हाला वाटत असेल. तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला जमिनीवरच बसून जेवलं पाहिजे. त्यामागे काही कारणं आहेत. ही कारणं आरोग्यााशी निगडीत आहेत.
जमिनीवर बसून का जेवलं पाहिजे?
पाचनशक्ती चांगली होते
जमिनीवर मांडी घालून जेवल्याने आपली पाचन क्रिया अत्यंत चांगली होते. जेव्हा तुम्ही प्लेट जमिनीवर ठेवता आणि जेवताना शरीर कधी खाली नेता आणि परत सरळ बसता तेव्हा तुमच्या मांसपेशी सक््रिय होतात. त्यामुळे शरीरातील एसिडचा स्त्राव वाढतो. शिवाय जेवणही वेगाने पचतं.
स्थूलपणा घालवा
जर तुम्हाला स्थूलपणा घालवायचा असेल तर तुम्ही नियमितपणे हा पॅटर्न फॉलो केला पाहिजे. तुमच्या मेंदूला आराम देण्यासाठी ही स्थिती अत्यंत प्रभावी आहे. त्याचबरोबर थकवा आणि शरीरातील कमजोरी कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होतो.
हृदय निरोगी असावं
सुखासनात जेवल्यावर आपलं हृदय अधिक चांगल्या पद्धतीने क्रियाशील राहतं. मांडी घालून जेवायला बसल्यावर तुम्ही तणावापासून मुक्त होता. शरारीतील रक्ताभिसरण चांगलं राहतं.
पॉश्चर ठिक होतं
इतर सर्व आसनांप्रमाणे सुखासनात बसल्याने पॉश्चर व्यवस्थित राहतं. त्यामुळे मांसपेशी आणि सांधे दुखण्यापासून आराम मिळतो. त्यामुळे तुम्हाला लवचिकता येते. पाठ ताठ ठेवतो आणि पायाला मजबूती येते. त्यामुळे जेवताना नेहमीच जमिनीवर बसून जेवलं पाहिजे. टेबलावर बसून जेवल्याने तुमची पचनशक्ती व्यवस्थित राहत नाही. मांडीही घालता येत नाही. शिवाय शरीराची हालचाल फारशी होत नाही. या उलट जमिनीवर मांडी घालून बसल्यास या सर्व गोष्टींचा फायदा होतो. भारतीय बैठक मारून जेवण्याची पद्धत आता पाश्चात्य जगतातही रूढ होताना दिसत आहे.