झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरूfile photo
Published on
:
20 Nov 2024, 2:28 am
Updated on
:
20 Nov 2024, 2:28 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या ८१ सदस्यीय विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ३८ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. राज्यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखालील विरोधी 'इंडिया' आघाडी विरूद्ध भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात लढत आहे. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे.
गेल्या निवडणुकीत काय झालं होतं?
गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने ३० जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या, ज्या २०१४ मध्ये जिंकलेल्या ३७ जागांपेक्षा कमी होत्या. JMM-काँग्रेस-RJD आघाडीने ४७ जागांसह आघाडी सरकार स्थापन केले होते.