महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी आमदारांनी केल्या आहेत.Pudhari News Network
Published on
:
27 Nov 2024, 7:51 am
Updated on
:
27 Nov 2024, 7:51 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. अवघ्या ४६ जागा मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक २० जागा मिळाल्या. या निकालावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिवसेना आमदारांतून नाराजीचा सूर निघू लागला आहे. मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदारांनी याबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते शिवसेनेच्या मशालीकडे वळली नाहीत, अशा तक्रारी आमदारांनी ठाकरे यांच्याकडे केल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना सहकार्य केले नाही, असे त्यांनी यावेळी सांगून आमदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी यावेळी आमदारांनी केल्या. त्यामुळे ठाकरे शिवसेना महापालिका स्वबळावर लढणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुका वेगळ्या असतात. महानगरपालिका निवडणुका वेगळ्या असतात. तेथील स्थानिक समीकरणे वेगळी असतात, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.