डोंबिवलीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका उत्तरभारतीयाला अटक

4 days ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

19 Nov 2024, 12:43 pm

Updated on

19 Nov 2024, 12:43 pm

डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराचे गालबोट लागू नये यासाठी ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी विशेष प्रयत्‍न सुरु केले आहेत. मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी पिस्‍तूल विक्रीसाठी डोंबिवलीत दाखल झालेल्या एका उत्तरभारतीयाची ताब्‍यात घेतले असून त्याच्याकडून देशी बनावटीच्या २ पिस्तुलांसह ४ काडतुसे हस्तगत करण्यात क्राईम ब्रँचने यश मिळविले आहे. या पिस्‍तूलांची किंमत ९४ हजार रूपये आहे.

सुधीर रामनिवास ठाकूर (२२) असे अटक करण्यात असे संशयिताचे नाव असून तो उत्तरप्रदेशातल्या फतेहाबाद जिल्ह्यातील नगला जगमोहन गावचा रहिवासी आहे. ठाकूर याच्या पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ रेल्वे मैदान परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत. त्‍याच्या विरोधात विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ परिसरात असलेल्या रेल्वे मैदानासमोरच्या गणेश मंदिराजवळ एकजण देशी बनावटीची लोडेड पिस्तूले विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर खासगी गुप्तहेराकडून क्राईम ब्रँचचे हवालदार मिथुन राठोड यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष उगलमुगले, फौजदार विनोद पाटील, अनुप कामत, किशोर पाटील, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विलास कडू या पथकाने तत्‍काळ कारवाई करत सुधीर ठाकूर याला पिस्‍तूलासह ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article