Published on
:
29 Nov 2024, 12:28 pm
Updated on
:
29 Nov 2024, 12:28 pm
नवी दिल्ली : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पन्नीरसेल्वम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर ही स्थगिती देण्यात आली.
न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठाने तामिळनाडू पोलीस आणि मूळ तक्रारदारांना नोटीस बजावली आणि त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले.