तारक मेहता फेम दिलीप जोशी-निर्माते मोदी यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. instagram
Published on
:
19 Nov 2024, 8:23 am
Updated on
:
19 Nov 2024, 8:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - टेलिव्हिजनच्या दुनियेतील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सध्या खूप चर्चेत आहे, निर्माते या शोतील काही कलाकार यांच्यातील वाद आता सर्वश्रुत झाला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये जेठालाल चंपकलाल गडाची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यात मोठे भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण यावर्षी ऑगस्टच्या सुरुवातीचे आहे. असे म्हटले जात आहे की, हा वाद फी किंवा पैशांवरून नाही तर सुट्टीवरून झाला आहे. वृत्त आहे की, सुट्टीवरून दोघांच्या मध्ये खूप वाद झाला. या मालिकेशी सांबधित एका जवळच्या सूत्राने सांगितले की, दिलीप (जेठालाल) यांनी असित मोदी यांच्याकडे काही दिवसांची सुट्टी मागितली होती. पण, निर्मात्याने त्याच्याशी बातचीत टाळले. यावर जेठालाल निराश झाले. त्यांच्यामध्ये हाणामारीपर्यंत विषय आला होता.
आता सुट्टी कधी मिळणार याची दिलीप जोशींना प्रतीक्षा
मालिकेच्या एका सूत्राने वेबसाईटला सांगितले की, त्या दिवशी कुश शाह यांची शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यांनी म्हटले की, दिलीप जोशी निर्माते आल्यानंतर त्यांच्याशी सुट्टीबद्दल बोलण्याची प्रतीक्षा करत होते. पण ते आले, आणि सरळ कुशशी भेटायला गेले. हे पाहून दिलीप जोशी निराश झाले. त्यांच्यामध्ये तीर्व वाद झाला.
दिलीप जोशी यांनी त्यांची कॉलर पकडली?
इतकचं नाही तर असेही म्हटले जात आहे की, भांडण इतकं वाढलं की, दिलीप जोशी यांनी त्यांचे कॉलर पकडले आणि शो सोडण्याची धमकी दिली.
हाँगकाँग शूटिंगवेळी देखील झाले होते भांडण
तर असे म्हटले जात आहे की, याआधीही अशा प्रकारची परिस्थिती उद्धवली होती. मालिकेच्या हाँगकाँग प्रवासाच्या शूटिंगदरम्यान देखील दोघांमध्ये खूप वाद झाला. पण गुरुचरण सिंह सोढी यांनी दोघांमध्ये तडजोड घडवून आणली होती. या मालिकेतील अनेक महत्त्वाचे कलाकार दिशा वकानी, राज अनादकट, भव्य गांधी, गुरुचरण सिंह आणि जेनिफर मिस्त्रीसह अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे.