Sanjay Raut On Vinod Tawde distributing currency : राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. काल बुधवारी (२० नोव्हेंबर) महाराष्ट्रात मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. त्याच मतदानापूर्वी एक दिवस भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. नालासोपारा मतदारसंघात विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा […]
Sanjay Raut On Vinod Tawde distributing currency : राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. काल बुधवारी (२० नोव्हेंबर) महाराष्ट्रात मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. त्याच मतदानापूर्वी एक दिवस भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होत आहे. नालासोपारा मतदारसंघात विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी केला. यानंतर नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांना घेराव घातला आणि त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. तावड्यांकडे पाच कोटी होते, पण आयोगाने फक्त नऊ लाख कागदावर आणले असा आरोप आमदार ठाकूर करत आहेत. मग वरचा मलिदा सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस, आयोगाच्या लोकांनी कोणत्या दरवाजाचा वापर केला? असा आरोप संजय राऊतांनी केला. नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे, असे विधान संजय राऊतांनी केले.