महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान सुरु आहे, सामान्यांपासून ते राजकारणी, सेलिब्रेटी सर्वच आपाला मतदानाचा हक्क बजावत आहे. एवढच नाही तर त्याबद्दल त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टही करत आहे. तसेच त्यांनी केलेल्या मतदानाचे व्हिडीओ फोटोही सोशल मीडियावर येत आहे. अक्षय कुमारच्या बाबतीत मात्र मतदानाला जाताना त्याच्या सोबत एक वेगळाच किस्सा घडला.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४चं मतदान करण्यासाठी मुंबईत आला होता. अक्षय कुमारला मतदानासाठी जात असताना त्याला रस्त्यातच एका वृद्ध व्यक्तीने अडवले. त्याने बसवलेली शौचालये सडल्याची तक्रार त्याने अक्षयकडे करण्यास सुरुवात केली.
त्याचं झालं असं,अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. त्यावेळी ट्विंकल खन्नाने जुहू बीचचा फोटो पोस्ट करत उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांकडे लक्ष वेधले होते. २०१८मध्ये अक्षय कुमारने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिळून जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर १० लाख रुपये किमतीचे बायो टॉयलेट बसवले होते. अक्षय कुमारच्या या कामाचे खूप कौतुकही झाले होते. मात्र, आता तेच टॉयलेट खराब झाल्याचे या वृद्धाने त्याच्या लक्षात आणून दिले आहे.
त्यासाठी त्या वृद्धाने ते बायो टॉयलेट सडल्याची तक्रार अक्षय कुमारकडे केली. त्यावर अक्षयने आपण या संदर्भात बीएमसीशी बोलणार असल्याचे उत्तर दिले. त्यावर त्या वृद्धाने अक्षयने आणखी अशी शौचालये बसवावीत, अशी मागणीही केली. तसेच त्याने सांगितले की त्याने बांधलेले टॉयलेट सडले आहे. तीन-चार वर्षांपासून स्वच्छतागृहांची देखभाल तोच व्यक्ती करत असल्याचे त्याने सांगितले.
या जेष्ठ नागरिकाचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय हसला आणि त्याने उत्तर देत म्हटलं की, ‘ठीक आहे, आपण यावर काम करूया. मी बीएमसीशी बोलणार आहे.’ मग, त्या व्यक्तीने अक्षयला सांगितले, हे टॉयलेट हे लोखंडाचे आहेत, त्यामुळे ते लवकर सडतात. त्यात वेळोवेळी भरपूर पैसे खर्च करावे लागतो. यावर अक्षय उत्तर देत म्हणतो की, ‘आपण यावर नक्की बोलूया, काय करता येईल ते बघूया. महापालिकेने त्यांची काळजी घेणे अपेक्षित होते.’
यावर तो वृद्ध व्यक्ती अक्षयला म्हणतो की, ‘तु डबा दे, मी तो लावून घेतो आणि त्यात फार काही काम नाही.’ यावर अक्षयने उत्तर दिले की, ‘मी डब्बा तर आधीच दिला आहे.’ मग तो माणूस म्हणतो, ‘तोच सडला आहे.’ यावर अक्षय म्हणतो की, ‘तो डब्बा सडला आहे, तर आता बीएमसी बघेल.’अशा पद्धतीने या दोघांच्याही संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बरं या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. अक्षय कुमारने किमान त्या व्यक्तीची बाजू ऐकून घेतली त्याच्याशी शांतपणे बोलला याबद्दल सर्वजन त्याचे कौतुक करत आहेत.
akshay kumar’s kindness to seniors volition melt your heart. khiladi casts his ballot during maharashtra assembly elections 2024.
#AkshayKumar pic.twitter.com/zK3wTT15z8
— 𝙎𝙬𝙚𝙩𝙖 (@Swetaakkian) November 20, 2024