Published on
:
20 Nov 2024, 6:22 am
Updated on
:
20 Nov 2024, 6:22 am
कैमूर : जीवापाड एखाद्यावर प्रेम केल्यानंतर प्रेमात धोका मिळाला की, तो सहन होत नाही. असाच एक प्रकार बिहारमधील कैमूर शहरात एका तरूणाबरोबर घडला. एका तरूणाने लोकांचा विरोध झुगारून एका तृतीयपंथीयावर प्रेम करून लग्न केलं. दहा वर्षे ते एकत्र राहिले. मात्र असं काही घडलं की, त्या तरूणाला आपला जीव गमवावा लागला.
कैमूर जिल्ह्यातील अखलासपूर या गावात एका तरूणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मोहम्मद मेहबूब आलम (२९ वर्ष) असे मृत या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याप्रकरणी मृताच्या मोठ्या भावाने सांगितले की, माझा भाऊ मेहबूब आलम याचा विवाह चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरैल गावातील मेहंदी उर्फ सोनू या तृतीयपंथीशी झाला होता. कुंटुंबियांनी याबाबत सांगितले की, मेहंदी याच्याबरोबर मोहम्मद आलम हा दहा वर्षांपासून एकत्र राहत होता. दोघांचही एकमेकांवर प्रेम होतं. मात्र दहा दिवसांपूर्वी मेंहदी दुसऱ्या तरूणाबरोबर पळून गेला. त्यामुळे मोहम्मद तणावात होता. या तणावातून त्याने जीवन संपवले असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.