पुणे क्रिप्टो करन्सी फसवणूक प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात एक ऑडीओ क्लीप व्हायरल होत असून या क्लीपमध्ये सुळे आणि पटोले यांचे आवाज असल्याचे अजितदादांनी म्हटले आहे.
पुण्यातील कथित क्रिप्टो करन्सी फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील पैसा विधान सभा निवडणूकांसाठी वापरल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केलेला आहे. या प्रकरणात एक ऑडीओ क्लीप व्हायरल झालेली आहे. या व्हायरल ऑडीओ क्लीपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि कॉंग्रेसचे नेते नाना पटोल यांचा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. यावर हा आवाज आपला नसल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. एआयच्या जमान्यात कोणी असा आवाज तयार केला आहे हे शोधणे पोलिसांचे काम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अजितदादा काय काहीही बोलू शकतात असेही सुळे यांनी म्हटले आहे.
Published on: Nov 20, 2024 03:10 PM