दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांचा विजयी चौकार:काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंना दुसऱ्यांदा केले पराभूत
2 hours ago
1
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी चौकार ठोकत विजय मिळवला. काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधेंना दुसऱ्यांदा पराभूत करीत त्यांनी विजयी पताका फडकवली. वंचितचे विनय भांगे यांनीही चांगली लढत दिली. अखेरच्या टप्प्यात लढत फक्त फडणवीस आणि गुडधे यांच्यावर केंद्रीत झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी टपाली मतदानापासूनच आघाडी घेतली होती. तर ईव्हीएमच्या पहिल्या फेरीपासूनच फडणवीसांनी आघाडी घेतली होती. फडणवीसांना ४७१३ तर गुडधेंना २४६७ मते मिळाली होती. २५ व्या फेरीनंतर फडणवीस गुडधेंपेक्षा ३४ हजार ३०२ मतांनी पुढे होते. फडणवीस यांना ११५५०४ तर गुडधे यांना ८१,२०२ मते मिळाली होती. एकूण तिन फेऱ्या बाकी होत्या. ही आघाडी भरून निघणे शक्य नसल्याने कार्यकर्त्यांनी जल्लाेष सुरू केला. यापूर्वी फडणवीस येथून सलग तीनदा विजयी झाले होते. २००९ मध्ये फडणवीस यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा २७,७७५ मतांनी, २०१४ मध्ये प्रफुल्ल गुडधे यांचा ५८,९४२ मतांनी आणि २०१९ मध्ये आशिष देशमुख यांचा ४९,३४४ मतांनी पराभूत केले होते. या मतदारसंघात २०१४ मध्ये ५६.२१%, २०१९ मध्ये ४९.८७% आणि २०२४ मध्ये ५४.५९% मतदान झाले. एकूण झालेले मतदान : ५४.५९ टक्के पुरुष : ५४.९२ टक्के| महिला ५४.२९ टक्के एकूण २ लाख २ हजार २९८ पुरुष मतदारांपैकी १ लाख ११ हजार ९९ पुरुष मतदारांनी तर २ लाख ८ हजार ९१४ महिला मतदारांपैकी १ लाख १३ हजार ४१५ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदार : ४ लाख ११ हजार २४१ २ लाख २४ हजार ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयाची पाच कारणे गुडधेंच्या पराभवाची कारणे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा एकूण मतदान : ५४.५९ टक्के पुरुष : ५४.९२ टक्के | महिला ५४.२९ टक्के २ लाख २ हजार २९८ पुरुषांपैकी १ लाख ११ हजार ९९ मतदान केले. २ लाख ८ हजार ९१४ महिलांपैकी १ लाख १३ हजार ४१५ मतदान केले. एकूण मतदान : ४ लाख ११ हजार २४१ पैकी २ लाख २४ हजार ५१७ मतदान केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)