काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर. File Photo
Published on
:
19 Nov 2024, 5:13 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:13 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिलीली हे जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर ढाकापेक्षघही जवळपास पाच पट वाईट आहे. हे शहर देशाची राजधानी राहिली पाहिजे का?, असा सवाल करत मागील अनेक वर्ष वायू प्रदूषण समस्येचे निराकरण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत दिल्ली प्रदूषणावर भाष्य केले आहे.
केंद्र सरकार वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरले
शशी थरुर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दिल्लीतील वायू प्रदूषण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर ढाका पेक्षा जवळपास पाचपट वाईट आहे. अनेक वर्षे बिघडलेल्या परिस्थितीनंतरही केंद्र सरकार या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरलेआहे. केंद्र सरकार वर्षानुवर्षे या दुःस्वप्नाचे साक्षीदार आहे, त्याबद्दल काहीही करत नाही," असा आरोपही त्यांनी केला आहे.
Delhi is officially the most polluted city in the world, 4x Hazardous levels and nearly five times as bad as the second most polluted city, Dhaka. It is unconscionable that our government has been witnessing this nightmare for years and does nothing about it. I have run an Air… pic.twitter.com/sLZhfeo722
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 18, 2024शशी थरुरांनी दिल्लीत चौकांची नावेही बदलली
दिल्लीतील वायू प्रदूषणावर शशी थरूर यांनी केंद्रावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, जेव्हा हवा गुंणवता निर्देशांक (AQI) तब्बल 462 वर पोहोचला, तेव्हा त्याने व्यंग्यात्मक साईनबोर्ड शेअर केले, ज्यात दिल्लीच्या प्रतिष्ठित स्थानांचे नाव बदलून 'Pollutyens Delhi', 'Haze Khas', 'Dhua Kuan,' आणि 'चांदनी चोक' असे केले. तसेच केंद्र सरकारने सरकारने मुख्य रस्त्याचे नाव बदलून 'मरतव्य पथ' केले यात आश्चर्य नाही!, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता 'गंभीर प्लस' श्रेणीत पोहोचल्याने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) लागू करण्यात विलंब केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली सरकार आणि केंद्राच्या वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगावर (CAQM) जोरदार टीका केली. न्यायालयाने आदेश दिला की पुढील सूचना येईपर्यंत GRAP अंतर्गत स्टेज 4 निर्बंध लागू राहतील.