दिव्य मराठी अपडेट्स:अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबईच्या रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

3 hours ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स छगन भुजबळ मुंबईच्या रुग्णालयात, प्रकृती स्थिर पुणे - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गुरुवारी तातडीने पुण्याहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भुजबळ पुणे दौऱ्यावर होते. तिथे त्यांना ताप आला व घशाचा संसर्ग सुरू झाला. प्राथमिक उपचार केले तरी सुधारणा होत नसल्याने त्यांना विशेष विमानाने तातडीने पुण्याहून मुंबईला हलवण्यात आले. बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रकृती स्थिर आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे भुजबळांच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने सांगण्यात आले. नाशिक, संभाजीनगर, पालघर, धुळ्यात आज आॅरेंज अलर्ट नाशिक - नाशिक धुळे, नंदुरबार, पालघर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला असून अॉरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी, वर्धा जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार, मुंबईत मध्यम, नगर, जळगावमध्ये हलका ते मध्यम, पुणे, साताऱ्यात जोरदार तर विदर्भात केवळ ढगाळ वातावरण राहील. मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून हवेच्या कमी दाबाचा द्रोणिय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड ते बांगलादेशपर्यंत पसरला आहे.त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यपाल बागडेंचा आज गडकरींच्या हस्ते सत्कार छत्रपती संभाजीनगर - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी (27 सप्टेंबर) राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता मुंबई विमानतळ येथून विशेष विमानाने संभाजीनगरकडे रवाना होणार. विमानतळावर दाखल झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर 11 वाजता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सलग तिसऱ्या दिवशी शहरात पावसाची हजेरी छत्रपती संभाजीनगर - सलग तिसऱ्या दिवशी शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (26 सप्टेंबर) रात्री नऊच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली. गेल्या आठवड्यापासून 30 अंशांपेक्षा जास्त असलेले कमाल तापमान 29.6 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले. दुपारी काही काळ सूर्यप्रकाश पडला. मात्र, सायंकाळनंतर ढगांची गर्दी वाढली. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. गारखेडा, शहानूरमियाँ दर्गा, जालना रोड आदी भागात पावसाचा जोर काहीसा जास्त होता. रात्री 11:30 पर्यंत शहरात 1.9 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत घेण्यात आली. आंदेकर खून प्रकरण : आणखी 1 आरोपी जेरबंद पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. विशेष “मकोका’ न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी या आरोपीला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा आकडा 21 वर गेला आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (68, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वनराज आंदेकरचा खून टोळी युद्धातून झाला असून यात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्यासाठी आरोपी अभिषेक खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वनराज आंदेकरचा खून झाल्यावर अभिषेक खोंड पसार झाला होता. हर्षवर्धन पाटील तुतारीच्या मार्गावर, पुन्हा चर्चा सुरू पुणे - भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा एकत्रित फोटो गुरुवारी व्हायरल झाला आहे. पितृपक्ष पंधरवड्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले. इंदापूर विधानसभा लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा अजित पवार गटाला सुटणार आहे. तेथे त्यांचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही, असे स्पष्ट झाल्यावर हर्षवर्धन यांनी दोन महिन्यांपासून हालचाली सुरू केल्या आहेत. महिनाभरापूर्वी त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेटही घेतली होती. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, हर्षवर्धन पक्ष सोडणार नाहीत. मात्र, 26 सप्टेंबर रोजी फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. या फोटोवर ‘नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी’ असे लिहिले आहे. 3200 रुपये ऊस दरासाठी अशोक‎चव्हाणांच्या कारखान्यावर रुमणे मोर्चा‎ नांदेड‎ - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव‎चव्हाण सहकारी कारखान्याकडून, ऊस‎उत्पादकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा‎आरोप करत, 26 रोजी नांदेड जिल्हा युवक‎काँग्रेसतर्फे कारखान्यावर शेतकऱ्यांचा रूमणे मोर्चा‎काढण्यात आला. ऊसाला 3200 रुपये प्रतिटन भाव‎द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.‎बालाजी पाटील गाढे यांनी नेतृत्व केले.‎ प्रमुख मागण्या अशा : ऊस लागवड‎केल्यापासून 14 महिन्यांच्या आत ऊसतोड करावी,‎ऊसतोड केल्यापासून 15 दिवसांच्या आत‎शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे,‎उसबिलाच्या थकीत हप्त्यांचे पैसे तात्काळ‎शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत,‎कारखान्यावर दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कामावर‎असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे, अशा‎मागण्या आंदोलकांनी निवेदनातून मांडल्या.‎ पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता म. गांधी सप्ताहाचे आयोजन पुणे - महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे पुण्यात 1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्त्व तसेच त्यांच्या योगदानाची आठवण ठेवून व्याख्याने, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, भजन, शांती मार्च, खादी प्रदर्शन, गांधी चित्रपट महोत्सव, पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे 13 वे वर्ष असल्याचे आयोजकांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article