दिव्य मराठी अपडेट्स:महायुती सरकारने वक्फ बोर्डाला जारी केला 10 कोटी रुपयांचा तातडीचा निधी, शासन निर्णयही जारी
2 hours ago
1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स... महायुती सरकारने वक्फ बोर्डाला जारी केला 10 कोटींचा निधी, GR जारी मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डासाठी तब्बल 10 कोटींचा निधी तत्काळ जाहीर करण्याची मोठी घोषणा केली आहे. यासंबंधी राज्याच्या अल्पसंख्यक विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. निवडणूक प्रचारात भाजपने वक्फ जमिनीच्या व्यवस्थापनावर चिंता व्यक्त केली होती हे विशेष. गत जून महिन्यात अल्पसंख्याक कल्याण विभागाने छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाला 2 कोटी रुपयांचा निधी दिला होता. तसेच उर्वरित रक्कम नंतर देण्याचे जाहीर केले होते. त्याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. विहिंपचे कोकण विभागाचे सचिव मोहन सालेकर यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने सरकारने जे केली नाही ते युती सरकार करत आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्षांना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. एक्सप्लेनर:अजमेर शरीफ दर्गा पूर्वी महादेवाचे मंदिर होते का? 'अजमेर दर्ग्याला संकटमोचन महादेव मंदिर घोषित करावे, ही आमची मागणी आहे. दर्ग्याची कोणत्याही प्रकारची नोंदणी असल्यास ती रद्द करावी. त्याचे ASI सर्वेक्षण करून तेथे हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार द्यावा. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर येथील न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत ही माहिती दिली आहे. 27 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने याचिका स्वीकारली. अजमेर शरीफ दर्गा हे शिवमंदिर असल्याचा दावा का केला जात आहे, या विषयावर आजचे एक्सप्लेनर आहे. वाचा सविस्तर अडीच तास चर्चा, सीएम गुलदस्त्यातच मुंबई - मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे बुधवारीच स्पष्ट झाले. मात्र त्यानंतरच्या २४ तासांतही त्यांचे नाव गुलदस्त्यातच होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व जे.पी. नड्डा यांची गुरुवारी रात्री ९.३० ते १२ वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्रिपदी भाजपकडून जे नाव ठरवले जाणार आहे त्यावर चर्चा झाली. मित्रपक्षांची संमती घेतल्यानंतरच हे नाव जाहीर करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. वाचा सविस्तर संभल हिंसाचारातील सर्वात छोटा आरोपी 14 वर्षांचा संभळ - 'नजरानाचे लग्न ठरले होते. लग्न पुढच्या वर्षी होणार होते. आम्ही सर्वकाही ठरवले होते. संभल येथे दगडफेक झाली तेव्हा पोलिसांनी नजरानालाही पकडले. ती अजून घरी आली नाही. तिचे लग्नही मोडले. नजरानाची आई साबरी संभलच्या हिंदुपूर खेडा येथे राहतात. येथील बहुतांश घरांना कुलूप आहे. हिंसाचारानंतर लोक आपली घरे आणि दुकाने बंद करून निघून गेले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी हिंसाचाराच्या आरोपाखाली 30 जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन महिला आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. वाचा सविस्तर शस्त्रक्रियेनंतर मुलाचा मृत्यू:मृत्यूनंतर 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर, 6 डॉक्टरांवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर - फायमोसिस विथ पिनलाइन टाॅर्शन (लघवीच्या जागेवरील खाज) या आजाराची सुमारे २५ मिनिटांत शस्त्रक्रिया होईल, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बालकाला भुलीनंतर ३-३ इंजेक्शन्स देण्यात आली होती. वाचा सविस्तर आमचा लाडका छावा पुन्हा मुख्यमंत्रिपदी हवा, संभाजीनगरात होर्डिंग छत्रपती संभाजीनगर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे बुधवारी जाहीर केले. मात्र, त्यानंतर शहरातील मुख्य चौकात ‘आमचा लाडका छावा पुन्हा मुख्यमंत्रिपदी हवा’, ‘शिंदे सरकार मराठा सरदार’ अशा आशयाचे होर्डिंग झळकले. होर्डिंगखाली ‘सकल मराठा समाज’ असे लिहिले आहे. याबाबत एजन्सीकडे विचारणा केली असता, मुंबईच्या एजन्सीने कंत्राट दिल्याचे सांगण्यात आले. शहरात २८ ठिकाणी हे होर्डिंग लागले आहेत. वाचा सविस्तर पुतिन म्हणाले- ट्रम्प अजूनही सुरक्षित नाहीत अस्ताना - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. सीएनएनच्या वृत्तानुसार, पुतिन म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून ट्रम्प यांनी मोठी परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी ते अद्याप सुरक्षित नाहीत. वाचा सविस्तर 8 राज्यांमध्ये धुके, लाहौल-स्पितीमध्ये तापमान -11º:MP तील 2 शहरे शिमल्यापेक्षा थंड; फेंगल चक्रीवादळ उद्या तामिळनाडूला धडकू शकते नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/श्रीनगर - देशाच्या उत्तरेकडील राज्यांसह मध्य भारतातील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने 8 राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर सध्या सर्वात थंड राज्ये आहेत. हवामान खात्याने सांगितले की, हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये रात्रीचे तापमान उणे 11 अंशांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत येथील थंडी आणखी वाढू शकते. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)