देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा:पुणे भाजपने केले होमहवन व महाआरतीचे आयोजन
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी बुधवारी पुण्यातील सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश याग, होमहवन आणि महाआरतीचे आयोजन शहर भाजप तर्फे करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, बाबा मिसाळ,प्रवक्ते संदीप खर्डेकर, दीपक पोटे,प्रमोद कोंढरे ,आबा शिळीमकर, सुशील मेंगडे, गायत्री खडके,पुनीत जोशी, गणेश घोष,वर्षा तापकीर, दिलीप काळोखे, मनीषा लडकत, महेश पुंडे, गणेश कळमकर, रघुनाथ गौडा, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले , जय प्रकाश पुरोहित, विकास लवटे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासाचे एकच केंद्र देवेंद्र, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, महाराष्ट्रचा मुख्यमंत्री एकच देवा भाऊ, अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा चांगला अनुभव असून त्यांनी चांगल्या प्रकारे विकास कामे राज्यात केली आहे. राज्यात महायुतीला चांगले यश निवडणुकीत मिळाले असून फडणवीस यांचे नेतृत्व मजबूत असून स्पष्ट दृष्टिकोन आणि राज्याच्या विकासाची हमी आहे. आघाडी मधील पक्ष एकमेकांवर आरोप करत असून त्यांनी ईव्हीएम मशीनवर देतील संशय व्यक्त केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत त्यांना फटकारलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात अनेक वेळा ईव्हीएम बाबत आक्षेप नोंदवण्यात आले मात्र कोणताही आरोप विरोधक सिद्ध करू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएम मशीन बाबत आक्षेप व्यक्त केला नाही मात्र,विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ते आक्षेप व्यक्त करत आहे.आघाडी मधील पक्षांनी पुढील पाच वर्ष त्यांची पक्ष संघटना बळकट करावी केवळ भाजपवर बिनबुडाचे आरोप करू नये.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)