देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य:पण एकनाथ शिंदेंचा चेहरा रंग उडालेला गंभीर अन् भावनाशून्य; शहांसोबतच्या बैठकीत काय घडले?
1 hour ago
1
महाराष्ट्राचा नवा कारभारी ठरवण्यासाठी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता महायुतीचे इतर सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. त्यामुळे अमित शहांसोबतच्या बैठकीत असे काय घडले की शिंदेंच्या चेहऱ्यांवरील हास्य उडून गेले? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. त्यामुळे साहजिकच भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट होते. पण हा नेता देवेंद्र फडणवीस असतील की अन्य एखादा? याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. या मुद्यावर विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना आपल्या निवासस्थानी बोलावले होते. या नेत्यांची गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत बैठक झाली. अटकळींचा बाजार गरम या बैठकीत महाराष्ट्रातील नव्या सरकारची बरीचशी रुपरेषा स्पष्ट झाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. आता या बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या फोटोतील देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे दिसून येत आहे. ते या फोटोत अत्यंत भावनाशून्य व गंभीर दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पहिला फोटो - या फोटोत देवेंद्र फडणवीस फुलांचा गुलदस्ता देऊन अमित शहा यांचे स्वागत करत आहेत. तर एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला उभे आहेत. या फोटोत देवेंद्र फडणवीस मनमोकळेपणाने हसत आहेत. त्यांचे हे हास्य खूप काही सांगून जाणारे आहे. त्यामुळे शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या फोटोत अत्यंत धीरगंभीर दिसून येत आहेत. त्यांचा चेहराही उतरल्यासारखा दिसत आहेत. त्यामुळे शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळणार नसल्याचे मानले जात आहे. दुसरा फोटो - दुसऱ्या फोटोत अजित पवार फुलांचा गुलदस्ता व शॉल देऊन अमित शहांचे स्वागत करताना दिसून येत आहेत. या फोटोतही अमित शहा, अजित पवार, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे खळखळून हसताना दिसत आहेत. पण या फोटोतही एकनाथ शिंदे अत्यंत शांत दिसून येत आहेत. येथेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसून येत नाहीत. आता या तिन्ही फोटोनंतर अटकळींचा बाजार गरम झाला आहे. पण तूर्त महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार यासाठी आपल्याला आणखी 2 दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. हे ही वाचा... शिदेंना DCM सह केंद्रातील मंत्रीपदाची ऑफर:CM पदावर रविवारी फैसला, भाजप ऐनवेळी मराठा कार्ड खेळण्याची दाट शक्यता मुंबई - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार मुंबईत परतलेत. एकनाथ शिंदे कालच्या बैठकीनंतर म्हणाले की, माझी अमित शहा व जे पी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. महायुतीची आणखी एक बैठक मुंबईत होईल. त्यात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल. शिंदे फडणवीस व अजित पवारांची अमित शहांसोबत जवळपास अडीत तास चर्चा झोाली. त्यानंतर शहांनी शिंदेंसोबत अर्धा तास सल्लामसलत केली. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)