देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही:उलट कुबड्याच त्यांच्यावर अवलंबून, विजय वडेट्टीवारांचा शिंदे, अजित पवारांना टोला

2 hours ago 1
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी फडणवीसांना कोणत्याही कुबड्यांची गरज नाही. तर उलट कुबड्याच फडणवीसांवर अवलंबून आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी अजित पवार यांना हाणला. फडणवीसांना आता कोणी थांबवू शकत नाही. विदर्भाचे लेकरू म्हणून विदर्भाला विविध क्षेत्रात न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवू, असे ते म्हणाले. फडणवीस बदला घेण्याचे आणि सूडाचे राजकारण करतात असे त्यांच्या बद्दल बोलले जात होते. तसा ठपका त्यांच्यावर होता. हा ठपका पुसून निघेल अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले. कोणतीही लढाई विचारधारेची असावी. इथे कोणी कोणाचा वैयक्तिक वैरी नाही. फडणवीसांनी त्यांच्यावर असलेला ठपका पुसून काढावा असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांना आता मुख्यमंत्री पद मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा चेडरा पडलेला असणे स्वाभाविक आहे. २०२९ मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपयुक्तता संपलेली राहिल असे दिसते. दोघांनाही आता मोदी व फडणवीस यांच्या आशीर्वादाने राहावे लागणार आहे. मिळेल त्यात समाधान मानून घेण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय नाही असे ते म्हणाले. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही तर दुसरा तयार आहे. त्यांची मजबुरी आहे. पक्ष सांभाळण्यासाठी त्यांना नमते घ्यावे लागेल, असा टोला वडेट्टीवार यांनी हाणला. प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते रा. स्व. संघाचे एजंट असल्याचा आरोप केला. ते असे का बोलले माहित नाही. त्यांच्या संतापाचा उद्रेक का झाला, ही भाषा का वापरत आहे याची माहिती घेवून हायकामंडच्या कानावर घालू, असे ते म्हणाले. बंटी शेळके हा लढवय्या आहे. निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी राग व्यक्त केला. नाना पटोले हटाव अशी कोणतीही मोहीम नाही. आणि असली तरी त्यात माझा सहभाग नाही. व्यक्तिशः मोहीम राबविण्याची आवश्यकता नाही. काही चुका होत असतात. राज्यात मोठा पराजय होत असेल तर मंथन होणे गरजेचे आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article