रत्नागिरी ः निवडणूक कर्तव्यावर रवाना होण्यापूर्वी कर्मचार्यांना सूचना देताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी.pudhari photo
Published on
:
20 Nov 2024, 12:40 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:40 am
रत्नागिरी ः बुधवार 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतदान पार पडणार आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी एकूण 2 हजार 404 पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या मदतीला 1 हजार 600 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
बुधवारी होत असलेल्या निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी एकूण 6 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाच्या 4 तर राज्य राखीव पोलिस दलाच्या 2 तुकड्यांचा त्यात समावेश आहे. या सर्व पोलिस बंदोबस्तासाची निगराणी करण्यासाठी 123 पोलिस अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच आचार संहितेचा भंग होउ नये याची खबरदारी घेण्यासाठी पोलिस विभागातर्फे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 78 सेक्टर तयार केले असून त्याठिकाणी गस्त घालण्यात येत आहे.(Maharashtra assembly polls)
त्याचप्रमाणे पोलिस विभागातर्फे 21 एसएसटी टीम (स्टॅटिक सर्व्हिलन्स टिम) कार्यरत असून त्याव्दारे 6 आंतरजिल्हा चेक पोस्टवर पोलिस वाहनांची कसून तपासणी करत आहेत. सोशल मीडियावर निवडण्ाुकीच्या काळात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होउन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी सायबरची एक टिमही कार्यरत ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही व्हॅन जिल्ह्यातील विविध भागात जाऊन चित्रिकरण करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.