राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास लागला आहे. राज्यात महाविकासाघाडीला मोठा झटका बसला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदावर धीरज विलासराव देशमुख यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना १ लाखांची लीड मिळाली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लातूर ग्रामीण मधून भाजपच्या रमेश कराड यांचा विजय झाला आहे.
दुसरीकडे लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख फक्त १८०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे येथे ही अतीतटीची लढत आहे. काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या जाणाऱ्या लातूर ग्रामीण आणि लातूर शहरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा या जागेवरून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख आघाडीवर होते, तर मतमोजणीच्या सहाव्या फेरीत भाजपच्या डॉ अर्चना पाटील चाकूरकर पुढे गेल्या.
लातूर शहरात माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने काँग्रेसच्या विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांच्या विरोधात रिंगणात उतरवण्यात आले होते. अमित देशमुख हे येथून तीन वेळा आमदार आहेत. याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.