Published on
:
20 Nov 2024, 9:32 am
Updated on
:
20 Nov 2024, 9:32 am
धुळे : धुळे जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पाच मतदारसंघातून दुपारी एक वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान शिरपूर तालुक्यात तर सर्वात कमी मतदान धुळे शहरात झाले आहे.
धुळे जिल्ह्यात 18 लाख 31 हजार 326 मतदार आहेत. यात 9 लाख 36 हजार 808 पुरुष तर 8 लाख 94 हजार 468 महिला मतदार आहेत.
साक्री तालुक्यात एक लाख 86 हजार 884 पुरुष तर एक लाख 78 हजार 516 महिला असे तीन लाख 65 हजार 407 मतदार आहेत.
धुळे तालुक्यात दोन लाख दहा हजार 743 पुरुष तर 1 लाख 98 हजार 731 महिला असे चार लाख 9 हजार 475 मतदार आहेत.
धुळे शहरात एक लाख 88 हजार 529 पुरुष तर एक लाख 75 हजार 880 महिला असे तीन लाख 64 हजार 440 मतदार आहेत.
शिंदखेडा तालुक्यात एक लाख 73 हजार 446 पुरुष तर एक लाख 67 हजार 562 महिला असे तीन लाख 41 हजार मतदार आहेत.
शिरपूर तालुक्यात एक लाख 77 हजार 206 पुरुष तर एक लाख 73 हजार महिला अशा तीन लाख 50 हजार 996 मतदार आहेत.
साक्री तालुक्यात 64 हजार 921 पुरुष तर 64 हजार 298 महिला असे एक लाख 29 हजार 219 जणांनी मतदान केले. या तालुक्यात 35.36 टक्के मतदान झाले आहे.
धुळे तालुक्यात 69 हजार 563 महिला तर 67 हजार 547 महिला अशा एक लाख 37 हजार 110 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 33.48 टक्के इतकी आहे.
धुळे शहरात 56 हजार 429 पुरुष तर 52 हजार 309 महिला अशा एक लाख 9209 जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी सर्वात कमी 29.97 अशी आहे.
शिंदखेडा मतदारसंघात 56 हजार 630 पुरुष तर 56 हजार 508 महिला अशा एक लाख 13 हजार 138 जणांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 33.18 इतकी आहे.
शिरपूर तालुक्यातून 67 हजार 464 पुरुष तर 67 हजार 341 अशा एक लाख 34 हजार 810 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी जिल्ह्यात सर्वाधिक 38.41 इतकी आहे.
जिल्ह्यात एकूण लाख 15 हजार 417 पुरुष तर तीन लाख 8 हजार 63 महिला अशा सहा लाख 23 हजार 886 मतदारांनी मतदान केले आहे. त्याची टक्केवारी 34.05 इतकी आहे