Published on
:
23 Nov 2024, 5:20 am
Updated on
:
23 Nov 2024, 5:20 am
धुळे पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यातील साखरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या शिवसेनेचे आमदार मंजुळाताई गावित या पंधराशे पन्नास पिछाडीवर आहेत. तर धुळे ग्रामीणचे आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील हे तब्बल 5248 मतांनी पिछाडीवर आहेत.
साक्री विधानसभेमध्ये दुसऱ्या फेरी अखेर काँग्रेसचे प्रवीण चौरे यांना 3581 तर आमदार गावित यांना 2031 मते मिळाली आहेत.
धुळे ग्रामीण मध्ये तिसऱ्या फेरी अखेर कुणाल पाटील यांना 6797 तर भारतीय जनता पार्टीचे राम भदाणे यांना 12,045 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात महा विकास आघाडीचे उमेदवार तथा काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे 5248 मतांनी पिछाडीवर आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांना 17512 मते मिळाली असून विद्यमान आमदार तथा एम आय एम चे उमेदवार फारुक शाह यांना 9698 मते मिळाली आहेत. माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 3675 मते मिळाली आहेत. या फेरी अखेर अनुप अग्रवाल यांना 7814 मतांची आघाडी आहे. शिरपूर विधानसभा मतदारसंघात काशीराम पावरा यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना चौथ्या फेरी अखेर 26,628 मते मिळाली असून अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना 8497 मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे काशीराम पावरा यांना 18,131 मतांची आघाडी आहे.