नऊ दिवसांच्या उपोषणाने जरांगेंंच्या किडनीवर सूज:समाजबांधवांना 4 दिवस भेटायला न येण्याचे आवाहन

3 hours ago 1
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासठी दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांनी ९ दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या किडनीवर सूज आली असून लिव्हरमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे १५ दिवस आराम करण्याची नितांत गरज असून ४ दिवस समाजबांधवांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन डॉक्टर विनोद चावरे यांनी गुरुवारी (२६ सप्टेंबर) मराठा समाजबांधवांना केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे नऊ दिवस उपोषण केले. जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना बुधवारी (२५ सप्टेंबर) रात्री शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांच्या सर्व तपासण्या करून वैद्यकीय उपचार करण्यात येत आहेत. जरांगे यांची गुरुवारी लिव्हर, किडनी, सोनोग्राफी, टूडी इकोची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बदल आढळून आला असून त्यांना उपचारांची नितांत गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. भेटायला येऊ नका जरांगे यांना डॉक्टरांनी आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कुणीही रुग्णालयात त्यांना भेटण्यास येऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. जरांगे यांच्या प्रकृतीची सर्वांना काळजी आहे. पण, त्यांच्या आरोग्यासाठी कुणीही रुग्णालयात भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन समन्वयक सुनील कोटकर यांनी केले. ‘या’ नेत्यांनी घेतली भेट माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, शंकरअण्णा धोंडगे, आमदार बच्चू कडू यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. तसेच प्रकृतीची विचारपूस करीत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article