Published on
:
20 Nov 2024, 7:57 am
Updated on
:
20 Nov 2024, 7:57 am
विधानसभेच्या अहिल्यानगर शहर मतदारसंघासाठी बुधवारी(दि. 20) रोजी मतदान होत असून, सुमारे तीन लाख 16 हजार 794 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. त्यासाठी निवडणूक अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामातून 297 मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिनच्या पेट्या घेऊन कर्मचारी रवाना झाले. मतदान यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सुमारे 1656 कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यासाठी कर्मचारी, पोलिस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्रावर सुविधा अशा सर्व गोष्टींची प्रशासनाने तयारी केली आहे. नगर शहर मतदारसंघासाठी 297 मतदान केंद्र आहेत. तर, 81 लोकेशन्स आहेत. ईव्हीएम मशिन ठेवण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या एक क्रमांकाच्या गोदामामध्ये स्ट्राँग रूम करण्यात आले आहे. तर, सहा नंबरच्या गोदामामध्ये डिसपॅच आणि रिसिव्हिंग सेंटर तयार करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.19) रोजी मतदान केंद्रावर नियुक्ती केलेले कर्मचारी व अधिकार्यांना ईव्हीएम मशिन पेटी व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी तीस टेबल तयार करण्यात आले होते.
प्रत्येकी एक टेबलवरून दहा मतदान केंद्राच्या कर्मचार्यांना साहित्या वाटप करण्यात आले. शहरातील केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर, भिंगार, सारसनगर, बुरूडगाव अशा विविध मार्गावर 37 बसेस व 69 मोटारीतून साहित्या मतदान केंद्रावर पोहोच करण्यात आले. मतदान प्रक्रियेवर नियंत्रणासाठी 20 क्षेत्रीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
महिला संचलित केंद्र - मारूतराव घुले पाटील आर्टस कॉमर्स, सायन्स कॉलेज, बोल्हेगाव, खोली क्रमांक 6. दिव्यांग संचलित ः सरदार वल्लभभाई पटेल कन्या शाळा, भिंगार खोली क्र. 7. युवा संचलित ः जिल्हा परिषद शाळा शाहूनगर केडगाव, खोली 4. आदर्श मतदान केंद्र ः राधाबाई काळे महिला महाविद्यालय क्र. 5, आयकॉन पब्लिक स्कूल खोली 1, मारूतराव घुले पाटील आर्टस कॉमर्स, सायन्स कॉलेज, बोल्हेगाव खोली क्र. 2.
पुरूष ः 160646
स्त्री ः 156041
तृतीय पंथी ः 107
एकूण ः 316794