नवे सरकार येताच 1 लाख मराठ्यांसह जरांगेंचे उपोषण:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवालीत पुन्हा आंदोलन

3 days ago 2
राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधीनंतरच्या ८ दिवसांनी आंतरवाली सराटीत सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्यभरातून १ लाख मराठा नागरिकांचे सामूहिक आमरण उपोषण सुरू केले जाईल. आरक्षणासाठीचा हा अंतिम आण निर्णायक लढा असेल. एक लाख मराठे उपोषणाला बसले तर सत्ताही पडू शकते, असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी दिला. नवीन सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याची पुढील रणनीती काय असेल हे ‘दिव्य मराठी’ला या वेळी त्यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर १ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी लाठीहल्ला केला. यानंतर आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पसरली होती. विधानसभा निवडणुकीत सत्ता कुणाचीही आली तरी आरक्षाणासाठी मला लढा द्यावाच लागणार असल्याचे सांगत जरांगे म्हणाले की, नवे मंत्री झालेल्यांना ८ दिवस आनंद घेऊ देणार व त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. जर असे केले नाही तर सरकार माझ्या मरणाची वाट पाहतील व त्यानंतर सरकार स्थापन करतील अशी स्थिती आहे. आंतरवाली सराटीमध्ये जिकडे जागा मिळेल तिकडे उपोषण करण्यात येईल, जागा नसेल तर प्रसंगी आंदोलक रस्त्यावर बसतील. एका उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली तर दोन डॉक्टरची गरज असते, जर १ लाख उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली तर ? इतक्या मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आहेत काय ? कोण कुठे उपोषणाला बसणार हेही प्रशासनाला कळणार नाही,’ असे जरांगे यांनी सांगितले. ‘जरांगे पॅटर्न’च्या मेसेजची धास्ती लोकसभेप्रमाणे यंदाही जरांगे यांनी मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना पाडा, असे संदेश दिले आहेत. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारनिहाय मेसेज दिल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यानुसार सोशल मीडियावर प्रचारही सुरू आहे. मात्र जरांगेंचा मेसेज नेमका कुणाविरुद्ध या चिंतेने उमेदवारांना धास्ती बसलीय. तर ८४ जागा जिंकल्या असत्या समाज संकटात येईल असे पाऊल मी कधीही उचलणार नाही. विधानसभा निवडणूकीत समीकरण जमले असते तर ८४ जागा जिंकल्या असत्या. मात्र एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही, आंदोलनासाठी १ कोटी लोक जमले, बैठकीसाठी ३ लाख लोक जमतात, पण ते मतदारसंघाचे नसतात तर ते राज्यातील असतात, असेही जरांगे म्हणाले. ८ दिवसांत सलाइन लावावे लागते मी थोड्याच दिवसांचा पाहुणा या त्यांच्या वक्तव्यावर जरांगे म्हणाले की, उपोषणामुळे माझे शरीर मला साथ देत नाही, मला ८ ते १० दिवसांनी सलाइन लावावेच लागते, असेही जरांगे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article