Rahul Narvekar connected Maharashtra Government Formation : महाराष्ट्रात नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार? असे प्रश्न सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. अशातच राहुल नार्वेकर यांनी सत्तास्थापनेची तारीख सांगितली आहे. वाचा सविस्तर बातमी...
राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: ANI
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याची माहिती आहे. तर आता गृहमंत्रिपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मात्र भाजप गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी रखडला आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची संभाव्य तारीख सांगितली आहे. 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार आहे, असं नार्वेकर म्हणालेत.