नांदगावात पैसे वाटप करणारी गाडी पकडली:अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याने गाडीवर चढत नोटा फाडल्या, पोलिसांकडून वाहन जप्त
3 days ago
2
नांदगाव मतदारसंघात सकाळी सुहास कांदे आणि समीर भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे पैसे वाटप करणारी गाडी पकडली आहे. अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी पकडली आहे. गाडी पकडल्यानंतर एका कार्यकर्त्याने गाडीच्या टपावर चढून नोटा फाडल्या आणि उधळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव मतदारसंघातील साकोरा येथे मतदान केंद्राबाहेर एक गाडी येऊन थांबली. या गाडीत पैसे असल्याचा संशय अपक्ष उमेदवार रोहन बोरस यांच्या कार्यकर्त्यांना आला. कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घालत झडती घेतला असता गाडीत पैसे आढळले. कार्यकर्त्यांनी गाडी पकडताच चालक घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर कार्यकर्त्यांनी हातात नोटा घेऊन दाखवल्या. या दरम्यान, एक उत्साही कार्यकर्ता हातात नोटा घेऊन गाडीच्या टपावर चढला आणि त्याने नोटा फाडून फेकून दिल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून गाडी आणि रोकड जप्त केली आहे. गाडी कोणाची व पैसे कोणाचे आहेत? याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तर हे पैसे समीर भुजबळ यांचे असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा दरम्यान, आज सकाळीच आमदार सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले. शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना अपक्ष उमेदवार समीर भुजबळांच्या समर्थकांनी आडवले आहे. यानंतर धक्काबुक्की आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या राड्यानंतर आमदार कांदेंनी समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आमदार सुहास कांदेंनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात सुहास कांदे समर्थक अन् पोलिसांसमोर समीर भुजबळांना हातवारे करत तुझा मर्डर फिक्स म्हणत धमकी देत असल्याचे दिसत आहे. हे ही वाचा... शिर्डीत बोगस मतदान?:विखेंच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धुळ्याच्या मुलीचे लोणीत मतदान, प्रश्न विचारताच काढता पाय घेतला शिर्डीतील लोणी येथे बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धुळ्यातील एका तरुणीने लोणी येथे मतदान केल्याचे समोर आले आहे. ही तरुणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्याचे माहिती आहे. या तरुणीला ओळखपत्रासह इतर कागदपत्रांबद्दल विचारणा केली असता तिने मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)