मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील किल्ला परिसरात बूथ क्र. २६८ मधील ईव्हीएम मतदानानंतर स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यासाठी निघालेल्या गाडीवर व सरकारी कर्मचाऱ्यांवर जमावाने दगडफेक करुन हल्ला केला. कोतवाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले.काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य नागपूर मतदारसंघ-५५ चे एक झोनल ऑफिसर कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स सेंटरवर गेले. त्या वेळी त्यांच्या गाडीत दोन ईव्हीएम होते. हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्यांच्याकडे ईव्हीएम मशीन का ठेवल्या, असा सवाल केला. यामुळे गोंधळ झाला आणि बाचाबाची झाली. यात संतप्त कार्यकर्त्यांनी वाहनावर दगडफेक केली. यात वाहनाचे नुकसान झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यावर जमाव जमला. झोनल ऑफिसर आता मतदान केंद्रावर परतले असून पॅकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली. ईव्हीएमचे नुकसान झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले आहेे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)