नागपुरात श्याम मानव यांच्या सभेत गोंधळ:बॅनर फाडत जोरदार घोषणाबाजी, भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

3 hours ago 1
नागपुरात श्याम मानव यांच्या कार्यक्रमामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालीत कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आक्रमक कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिसांनी शेवटी त्यांना बाहेर काढले. वृत्त लिहीपर्यत कार्यक्रम सुरू झाला नव्हता. अंधश्रद्ध निर्मूलन समितीतर्फे "संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' या विषयावर बोले पेट्रोलपंपाजवळील विनोबा विचार केंद्रात मानव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तिथे जावून कार्यकर्त्यांनी श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. संविधान बदलाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण केले जात आहे, राजकीय मुद्दे मांडून काँग्रेसला समर्थन देण्यासाठी ही सभा घेतली जात असल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. अंधश्रद्धेचा या सभेशी काहीही संबंध नसल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे. २०१४ पासून संविधानात कोणते बदल झाले ते त्यांनी सांगावे, ते कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात तेही सांगावे असे प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. श्याम मानव यांच्या भाषणाआधीच भाजप युवा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. संपूर्ण गोंधळादरम्यान श्याम मानव स्टेजवर बसलेले होते. श्याम मानव यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या लोकांनीही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ आणखीणच वाढला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्याम मानव यांनी आचारसंहीता लागलेली असतानाही भाजयुमो कार्यकर्ते घालीत असलेला गोंधळ संविधान बुडवित असल्याचा आरोप केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article