नात्यातील मुलीविषयी अपशब्द वापरला:अल्पवयीन मुलांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात घातला दगड

1 hour ago 1
जवळच्या नात्यामधील एका मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीन मुलांनी एका 15 वर्षीय शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी मुला विरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सदर 15 वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहण्यास आहे. मुलाने शाळेतील एका मुलीबाबत अपशब्द उच्चारल्याने तिच्या नात्यातील अल्पवयीन मुले रागावली होती. सदर मुलगा सकाळी आठच्या सुमारास शाळेत जात असताना टिळेकरनगर परिसरातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीन मुलांनी संबधित मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. एका मुलाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण केल्यानंतर अल्पवयीन पसार झाले.गंभीर जखमी झालेल्या मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील पुढील तपास करत आहेत. बेपत्ता मुले - महिलांच्या शोधासाठी ऑपरेशन 'मुस्कान' हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात पुणे पोलिसांच्या वतीने ऑपरेशन मुस्कान 13 ही शोध मोहीम दि. 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 18 वर्षाखालील बालके, तसेच अल्पवयीन मुलींचा शोध घेतला जाणार आहे. सदर मोहिमेच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्ष, सर्व परिमंडळ पोलिस ठाणे निहाय टिम तयार केली असून ही टिम पुणे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेट देणार आहे. पोलिस ठाणे स्तरावर या मोहिमेसाठी एक अधिकारी व तीन पोलिस अमंलदार अशी विशेष टिम तयार केली जाणार आहे. दरम्यान अशी बेवारस मुले व महिला निदर्शनास आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article