नावापुढं काळा डाग…; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

3 days ago 2

NCP Sharad Pawar Group Leader Rohit Pawar Allegation : रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नावासमोर काळा डाग लावल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर...

नावापुढं काळा डाग...; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

रोहित पवार, आमदारImage Credit source: Facebook

| Updated on: Nov 20, 2024 | 10:04 AM

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. माझ्या नावाच्या डमी उमेदवाराच्या नावापुढे काळे डाग लावले आहेत, असं गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. नान्नज आणि झिक्री यासोबतच इतर मतदान केंद्रांना भेट दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. गरज पडल्यास या सगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मागवणार आहे, असं रोहित पवार म्हणालेत. या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे.

रोहित पवार यांचं ट्विट

सकाळी माझ्या मतदारसंघातील नान्नज आणि झिक्रीसह विविध बुथला भेट दिली असता तेथील परिस्थिती काय होती, याचा हा आढावा.. काही #EVM मशीनवर माझ्या विरोधकांच्या आणि माझ्या नावाच्या डमी उमेदवारांच्या नावापुढं काळा डाग लावल्याचंही निदर्शनास आलं असून हा रडीचा डाव आहे. हा काळा डाग हटवण्याची मागणी तेथील बुथ प्रमुखाकडं करण्यात आली. तसंच आमच्या मागणीनुसार मतदारसंघात संवेदनशील ठिकाणच्या बुथवर #CCTV कॅमेरे लावण्यात आले असून गरज पडल्यास हे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवू शकतो. त्यामुळं हे #CCTV कॅमेरे कायम सुरु राहतील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, ही विनंती!

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article