आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला.
विधानसभा निवडणुकीचं आज महाराष्ट्रात मतदान होतं आहे. मात्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष डॉ. रोहन बोरसे यांच्यात विधानसभेचा सामना होणार आहे. यंदा सुहास कांदे, गणेश धात्रक आणि समीर भुजबळ हे तीनही उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरल्याने तिहेरी लढत होत आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. आज मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी आडवल्याचे पाहायला मिळाले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार असून दोन्ही गटात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Nov 20, 2024 11:18 AM