निम्म्या महाराष्ट्रात मतदानाचा कल, बहीण लाडकी, भाऊ ‘मराठा’:कारण? बहिणींचा कौल युतीस, बहुतांश मराठा समाज विरोधात
2 days ago
1
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी राज्यात सरासरी ६५.०८ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये सरासरी ६१.१ टक्के मतदान झाले होते, त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली. गुरुवारी अंतिम आकडेवारी जाहीर होईल त्या वेळी आणखी वाढ होईल. लाडक्या बहिणींमुळे मतदानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सरासरी ७० % अधिक मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमध्ये राज्यात सर्वाधिक ८५% तर मराठवाड्यात सर्वाधिक ८०% मतदान संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये झाले. सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी मतदानात कोल्हापूरने (७६.२५%) राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सर्वात कमी मुंबई ५२% तर उपनगरात ५५% मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक ७१% मतदान १९९५ मध्ये झाले होते, त्याखालोखाल दुसरा विक्रम ३० वर्षांनी नोंदला गेला. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागेल. लाडक्या बहिणींचा कौल महायुतीला मिळण्याची शक्यता आहे, तर आरक्षणाच्या मुद्द्यावर नाराज मराठा समाजाने युतीविरोधात मते दिल्याचे संकेत आहेत. वाढलेला मतटक्का पाहता महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमतानेच सत्ता मिळण्याची शक्यता आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)