निवासी इमारतीखाली सापडला वृद्धाचा मृतदेहfile photo
Published on
:
20 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
20 Nov 2024, 12:45 am
रत्नागिरी ः शहरातील एम. जी. रोड येथील एका कॉम्प्लेक्सच्या खाली अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवार 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत खबर देणार यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार, सोमवारी दुपारी ते राहत असलेल्या नीळकंठ कॉम्प्लेक्सच्या खाली त्यांना गर्दी दिसून आली. त्यामुळे त्यांनी बिल्डिंगखाली जाऊन पाहिले असता त्यांना एक वृद्ध निपचित पडलेला दिसून आला. त्यांनी 108 रुग्णवाहिकेला फोन करून त्या वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेतील वृद्धाचे नाव गाव मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.