राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत रणधुमाळी माजली आहे. राज्या बुधवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारांच्या तोफा धडाडल्या. नेत्यांनी एकमेकांवर वैखरी टीका केल्या. अशात सेलिब्रिटी देखील त्यांच्या आवडत्या उमेदवारासाठी प्रचार करताना दिसले. राज्यात अनेक ठिकाणी सभा आणि भाषणं झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता राज्यात कोणाची सत्ता येणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एवढंच नाही तर, निवडणुकीच्या काळात सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पेस्ट देखील तुफान चर्चेत आल्या.
ऐन नुवडणुकीच्या काळात ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सोशल मीडिया पोस्ट करत एक भाबडा प्रश्न विचारला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटांना, नाटकांना सेंसॅार आहे तसं ह्या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही ? असा प्रश्न डॉ. गिरीश ओक यांनी उपस्थित केला आहे.
हे सुद्धा वाचा
फेसबूकवर पोस्ट शेअर करत डॉ. गिरीश ओक म्हणाले, ‘”मला पडलेला अजून एक भाबडा प्रश्न” चित्रपटांना, नाटकांना सेंसॅार आहे तसं ह्या निवडणूक प्रचार भाषणांना नाही का किंवा का नाही ? अहो सध्या फार पंचाईत होते मुलांबरोबर कुठल्याही बातम्यांच्या चॅनलवर ही भाषणं बघताना,ऐकताना.’
‘त्या भाषणां मधल्या नको नको त्या शब्दांचे, हातवाऱ्यांचे अर्थ विचारतात मुलं. त्या पेक्षा चित्रपटाच्या आधी जसं पेरेंटल गायडन्स १३+ १६+ १८+ येतं तसं निवडणूक आयोगानी ह्या भाषणांच्या आधी टाकलं तर बरं होईल नाही का?’ असं देखील प्रश्न डॉ. गिरीश ओक यांनी उपस्थित केला.
अभिनेते पुढे म्हणाले, ‘का तर आम्हाला तर कळलेलंच आहे कुठले राजकीय जेष्ठ लोकप्रतिनिधी किती अनपार्लमेंटरी बोलतात ते मुलांनाही कळायला नको म्हणून हो. एक सुजाण नागरिक पेरेंटल जबाबदारी….’, सध्या डॉ. गिरीश ओक यांची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
डॉ. गिरीश ओक यांच्या पोस्ट नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिला आहे. एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘त्यांना पण आहे हो पण कारवाई करायची कशी ही समस्या आहे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘एकदम टू द पॉईंट बोला आपने… पण, दुर्दैवाने कारवाई करणार कोण?’ अशा कमेंट नेटकरी करत आहेत.