नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग:एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचारांची मते मिळाली - विनोद तावडे

4 hours ago 1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत असून महायुतीला बहुमत मिळताना दिसत आहे. निकालाच्या या कलांवर अनेक राजकीय नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. तसेच भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती तोडल्याचा राग जनतेच्या मनात होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचारांची मते मिळाली, असे विनोद तावडे म्हणाले. विनोद तावडे म्हणाले, महायुतीला प्रचंड दिला, त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून मानतो, धन्यवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि रामदास आठवले या सगळ्यांनी एकत्रित काम केले. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते, पाणी, वीज, मेट्रो, वंदे भारत असे अप्रत्यक्ष लाभाचे राजकारण आणि लाडकी बहीण, शेतकरी सम्मान निधी, शून्य वीज बील असे प्रत्यक्ष लाभाचे राजकारण या दोन्हीचा बॅलेन्स देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केल्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसला. मुख्यमंत्रीपदाबाबत सगळे मिळून निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना विनोद तावडे म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबतचा निर्णय घेतील. आज महायुती म्हणून आम्ही विजयाचा आनंद घेतोय, असे ते म्हणाले. शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये तोडली. त्याचा वेगळा राग मतदारांच्या मनात होता, असे विनोद तावडे म्हणाले. रोज सकाळी राज्याचे वातावरण कलुशित होणारे वक्तव्य भांडूपवरून यायचे, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे धनुष्यबाण आणि हिंदुत्वाचे शिवसेना नाव हे हिंदुत्वाच्या मूळ प्रवाहात भाजपबरोबर आणल्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांच्या विचारांची मते मिळाली, असा दावा विनोद तावडे यांनी केला. जनतेने एनडीएवर विश्वास दाखवला महाराष्ट्रातील हा विजय, बिहार पोटनिवडणुकीत 4 जागांवर, उत्तर प्रदेशमध्ये 9 पैकी 6 जागांवर भाजप तसेच राजस्थानमध्ये 4 जागांवर भाजप पुढे आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएवर जनतेने विश्वास दाखवला आहे, असे विनोद तावडे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article