पतीच्या छळास कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या:प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
2 hours ago
1
माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रियंका अक्षय गाडे (वय २७, रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अक्षय राजेंद्र गाडे (वय २९ रा. आनंदनगर, हांडेवाडी, हडपसर, मूळ रा. कोतन, ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियंका यांचे वडील अजिनाथ सीताराम चांदणे (वय ६१, राा. पाटसरा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षयने प्रियंकाकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तिने नकार दिल्याने तो तिला त्रास देत होता. अक्षय तिला मारहाण करायचा. त्याच्या छळामुळे तिने राहत्या घरात गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. प्रियंकाने आत्महत्या करण्यापूर्वी एका पुठ्ठयावर मजकूर लिहून ठेवला होता. त्याच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने पुठ्ठयावर लिहून ठेवले होते. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. प्रियंकाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी अक्षयविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत. तडीपार करण्यात आलेले दोन गुन्हेगार जेरबंद तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोन सराइतांना पोलिसांनी पकडले. चतु:शृंगी आणि बाणेर परिसरात ही कारवाई करण्यात आली. गणेश यमनाप्पा कुर्डेकरी (वय २६, रा. पांडवनगर, वडारवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विकास वाघमारे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुर्डेकरी याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो चतु:शृंगी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले. दुसऱ्या एका कारवाईत बाणेर पोलिसांनी शहरातून तडीपार केलेला गुंड गौरव संभाजी काकडे (रा. पाषाण) याला पकडले. याबाबत पोलीस कर्मचारी अमित गद्रे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काकडे याला मार्च महिन्यात शहरातून तडीपार करण्यात आले होते. आदेशाचा भंग करून तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)