पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार आहे,File Photo
Published on
:
30 Nov 2024, 12:45 pm
Updated on
:
30 Nov 2024, 12:45 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : हायब्रीड मॉडेलच्या धर्तीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करा अन्यथा स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहा, असा सज्जड इशारा मिळाल्यानंतर पाकिस्ताने नमते घेतले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार आहे; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) एक महत्त्वाची अटही ठेवली आहे.
पाकिस्तानने नाकारले होते हायब्रीड मॉडेल
पाकिस्तान 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणार आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला जाण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नकार दिला होता. हायब्रीड मॉडेलच्या धर्तीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करा अन्यथा स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहा, असा सज्जड इशाराच आयसीसीने शुक्रवारी (दि.२९) पाकिस्तान क्रिकेट मंडळाला दिला होता. आतापर्यंत पीसीबी हायब्रीड मॉडेल नाकारत होते, पण आता त्याला फारसा पर्याय उरलेला नसल्यचे स्पष्ट झाले आहे.
'हायब्रीड मॉडेलचे धोरण 2031 पर्यंत लागू करावे'
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळ पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार आहे. यानुसार चॅम्पियन ट्रॉफीचे सामने भारत दुबईमध्ये सामने खेळेल; परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अशी अट ठेवली आहे की, आयसीसीचे हे धोरण 2031 पर्यंत सुरू ठेवेल. तसेचहा नियम त्याच्या सर्व स्पर्धांना लागू होईल.
आशिया कपही हायब्रीड मॉडेलनुसार
हायब्रीड मॉडेलला मान्यता मिळाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासह काही सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होऊ शकतात. यापूर्वी, गेल्या वर्षी आशिया चषक देखील हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. भारताच्या सामन्यासह अंतिम सामनाही सामना श्रीलंकेत झाला होता.