पायलटने अचानक विमान उडविण्यास दिला नकार, काय आहेत नियम ?

4 days ago 2

पायलटने जर प्रवासात अचानक विमान उडविण्यास नकार दिला तर काय होईल ? एअर इंडियाच्या एका इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये अशी धक्कादायक घटना घडली आहे. आपली ड्यूटी संपली असल्याचे सांगत एअर इंडियाच्या वैमानिकाने विमान उडविण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.ही घटना पॅरिस ते दिल्ली या प्रवासा दरम्यान घडली. हे विमान पॅरिसहून दिल्लीसाठी टेक ऑफ झाले होते. परंतू हवामान बिघडल्याने हे विमान जयपूरला वळविण्यात आले, तेथे विमान लॅंड झाल्यानंतर पायलट विमानातून खाली उतरला आणि त्याने विमान उडविण्यास नकार दिला…

जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडलेल्या या विचित्र घटनेने विमानात बसलेले १८० प्रवासी आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यानंतर प्रकरण कसे तरी आवरण्यात आले. परंतू या घटनेनंतर प्रश्न निर्माण झाला आहे की पायलटचे असे वागणे नियमात बसणारे आहे का? प्रवास अर्धवट असताना प्रवाशांना असे वाऱ्यांवर सोडणे नियमात बसते का ?पाहूयात..

काय आहे प्रकरण ?

एअर इंडियाचे फ्लाईट AI-२०२२ रविवारी रात्री दहा वाजता पॅरिस वाजता टेक ऑफ झाली होती. या विमानाला सोमवारी सकाळी १०.३५ वाजता दिल्लीत लॅंड व्हायचे होते. परंतू हवामानात बदल झाल्याने ते शक्य झालेले नाही. एअर ट्रॅफीक कंट्रोलने काही वेळ जयपूरला डायव्हर्ट केले आणि दुपारी १२.१० वाजता फ्लाईट लॅंड झाली. पायलट काही वेळ क्लीअरन्सची वाट पाहात राहीला. जेव्हा क्लीअरन्स न मिळाल्याने पायलटने FDTL चा हवाला देऊन त्याचा ड्यूटी टाईम संपल्याचे कारण देत विमान उड्डाणास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

कठोर नियम तयार

वैमानिकांसाठी ड्यूटी संबंधीचे खास नियम आहेत. त्यास फ्लाईट ड्रयूटी टाईम लिमिटेशन ( FDTL ) असे म्हटले जाते. कोणताही पायलट आराम न करता सलग विमान उडवू नये यासाठी त्यांचे ड्यूटीचे तास फिक्स केलेले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असे केलेले आहे. जर पायलट प्रवासात थकलेला असेल तर त्याच्याकडून मानवी चूका होऊ शकतात. त्यामुळे विमान अपघाताचा धोका होऊ शकतो. तसेच जर वैमानिक थकला असेल तर तो ड्यूटीचे तास संपण्याआधी देखील विमान सोडू शकतो. कारण थकलेला असताना त्याच्याकडून चुका होऊ शकतात. शेकडो प्रवाशांची जबाबदारी पायलटवर असल्याने असे कठोर नियम तयार केलेले आहेत. FDTL चे हे नियम जगभर मान्य आहेत.

किती तास ड्यूटी

फ्लाईट ड्रयूटी टाईम लिमिटेशन ( FDTL ) चे पालन सर्व विमान कंपन्यांना करणे बंधनकारक आहे. असे केले नाही तर विमान कंपनीवर कारवाई होऊ शकते. या नियमानुसार फ्लाईटचा क्रु एक आठवड्यात कमाल ३५ तास उड्डाण करु शकतो. एका महिन्यात १२५ तास आणि वर्षभरात एक हजार तास उड्डाण करु शकतो. क्रू साठी चोवीस तासात किमान दहा तास आराम करणे बंधनकारक आहे. विमान प्रवास लांबचा असेल पायलटला प्रवासा दरम्यान आराम करण्याची सोय असते. त्यावेळी पर्यायी पायलट देण्यात आलेला असतो.

ड्यूटी रोस्टर कसे तयार होते

जर विमान खराब हवामानाने वेळीच लॅंण्ड झाले नाही तर एअरलाईन्स फ्लाईटच्या क्रु ला काही वेळासाठी FDTL नियमातून सूट मिळू शकते. परंतू हे संपूर्ण पायलटवर अवलंबून असते की त्याने विमान उडवाचे की नाही ? नियमानुसार पायलटवर दबाव टाकू शकत नाही. एअरलाईन्स आणि फ्लाईटच्या क्रुला उड्डाणापूर्वी रोस्टर तयार करावे लागते. ते किमान सात दिवसांचे असते. यात विमानाची वेळ आणि विश्रांतीची वेळ नमूद केलेली असते. क्रु किती थकलेला आहे किती तासांचे उड्डाण झालेले आहे याचा रिपोर्ट तयार केला जातो. डीजीसीए कोणत्याही एअरलाईन्सकडून फ्लाईट क्रु चे रोस्टर मागण्यासाठी स्वतंत्र आहे.उड्डाणाच्या दरम्यान या नियमाचे पालन करण्याची जबाबदारी पायलट आणि क्रु मेंबर्सची असते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article