रक्तातील साखरेची पातळी वाढली की मधुमेह होतो. मधुमेह हा गंभीर आजार झाल्यानंतर अनेक नियम पाळावे लागतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीराशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे.
मधुमेहामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. तसेच खाणे-पिणे न टाळता आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या आहारात जास्त गोड किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका. मधुमेह झाला की सुरुवातीच्या काळात तणाव, चिंता, कमकुवत प्रतिकारशक्ती, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी आजारांचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर पायात दिसणाऱ्या लक्षणांविषयी सांगणार आहोत.
मधुमेहाची लक्षणे कोणती?
1. सतत पाणी प्यावं वाटणे 2. थकवा वाटणे 3. कोरडे तोंड पडणे 4. हात-पायावर मुंग्या येणे 5. वारंवार लघवी येणे 6. अस्पष्ट दृष्टी होणे 7. जखमा लवकर भरून येत नाहीत
मधुमेहानंतर पायात दिसून येतात ‘हे’ बदल
पायातील फोड : मधुमेहाच्या रुग्णांच्या पायावर किंवा इतर ठिकाणी जखमा असतात ज्या लवकर बऱ्या होत नाहीत. पायावरील किंवा इतरत्र झालेल्या जखमा लवकर भरून येत नाहीत. याशिवाय पायावरील जखमेला सूज येण्याचीही शक्यता असते.
पायांचा रंग बदलणे : मधुमेहात पायांचा रंग हळूहळू बदलतो. रक्तप्रवाहात अडथळा, बुरशीजन्य संसर्ग अशा अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे पायांचा रंग बदलू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे.
हात-पायावर मुंग्या येणे : मधुमेहात हात-पायावर मुंग्या येतात. यासोबतच थकवा आणि अशक्तपणाही जाणवतो. त्यामुळे लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
‘ही’ लक्षणे दिसू शकतात
जळजळ होणे, पाय किंवा तळपायाला सूज येणे. पाय दुखणे, पायाचे घोटे दुखणे हे देखील मधुमेह वाढण्याचे लक्षण आहे. हे उच्च कोलेस्ट्रॉलचे देखील लक्षण आहेत.
कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे?
मधुमेह झाल्यास आहारात जास्त गोड, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनाने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा डबाबंद फळांचा रस घेऊ नका. या पदार्थांच्या सेवनाने रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते आणि आरोग्य बिघडू लागते. रोजच्या आहारात मिठाई, पुडिंग, आईस्क्रीम, शेक इत्यादी पदार्थ कमीत कमी करावेत.
जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे गरजेचं आहे.