Published on
:
19 Nov 2024, 6:42 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:42 am
खानिवडे : पूर्वापार प्रचलित प्रचाराच्या पद्धतीत आता सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम झाले असून यंदा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरू असल्याचे सोशल मीडियात डोकावून पाहताना दिसून येत आहे. यात उमेदवारांच्या समर्थकांनी टवाळखोर किंवा आमचाच उमेदवार कार्यासम्राट असे भासवणारी पोस्ट शेअर केली की लागलीच प्रतिस्पर्धी समर्थक त्यांना प्रतिउत्तरादाखल वरचढ पोस्ट शेअर करत असल्याने डिजिटल प्रचारात मोठी रंगत निर्माण झाली आहे.
दावे प्रतिदावे केलेली विकासकामे, निवडून आलो तर करणार असलेली कामे आणि आता सत्तेत होतात तर परिसराची का नाही केली विकासकामे या संदर्भातील मॅसेज सद्ध्या समर्थकांकडून सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि सर्वांकडून सर्वांच्या हातात चोवीस तास असणाऱ्या सर्रास वापरण्यात येणाऱ्या मोबाईलच्या वाटसप वर सोडून प्रचार करण्यात येत आहे. यात प्रत्येक उमेदवाराची एक स्वतःची वॉर रुम कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे नेहमीप्रमाणे पोस्टर, बॅनरबाजी, रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटी, रिक्षा, टेम्पोला कर्णे लावून करण्यात येणाऱ्या प्रचारात आता डिजिटल स्क्रीनसह सोशल मीडियाचा पगडा भारी झाला आहे.
त्यामुळे आता कुठल्याही प्रच- ारात, माहिती देण्यात आणि घेण्यात, घटना समजण्यात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियाचा वापर करून प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.