पुण्यात अल्पवयीन मुलीवर चौघांकडून बलात्कार:कोरेगाव पार्कमध्ये तक्रार, मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी, आरोपींत 2 अल्पवयीन

3 hours ago 1
पुण्यातील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एका १६ वर्षीय मुलीवर ओळखीच्या ४ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दोन सज्ञान आणि दोन अल्पवयीन आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वप्निल गाडेकर (२० ) आणि ओम घोलप (२०, रा. धनकवडी , पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच १६ वर्षे २ विधिसंघर्षग्रस्त बालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते १२ सप्टेंबरपर्यंत आरोपी स्वप्निल गाडेकर, ओम घोलप आणि २ अल्पवयीन मुलांनी मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. स्वप्निल गाडेकर, ओम घोलप, एक अल्पवयीन आरोपी यांनी घटनेचे व्हिडिओ काढून तसेच दुसऱ्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीचे अर्धनग्न फोटो तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार अत्याचार केले. मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनोळख्या लाेकांनी तिला मेसेज व शारीरिक सुखाची मागणी केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. अकोल्यात बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार अकोला | मित्र, मैत्रीण व दूरच्या नात्यातील अशा चौघांनी संगनमताने दहावीतील मुलीला तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने दारू पाजली. नशेत दोघांनी तिच्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल केले. ही घटना अकोल्यातील जुन्या शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पायलला अटक केली असून तिचे ३ मित्र फरार झाले आहेत. भुसावळ तालुक्यातील रहिवासी १५ वर्षीय मुलगी चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आली होती. ती दारफैल अकोला येथे दहावीत शिकते. तिच्या मानलेल्या मावशीच्या मुलीने किरण इंगळे ही मामी आहे, असे सांगून तिच्यासोबत ओळख करून दिली होती. त्यामुळे पीडित मुलीचे तिच्या घरी येणेजाणे होते. किरण इंगळेचा पती लल्ला इंगळे याने पीडितेची ओळख बंटी सटवाले याच्यासोबत करून दिली. नंतर बंटीने तिची ओळख त्याची प्रेयसी पायलसोबत करून दिली. या तिघांनी तिला विश्वासात घेतले व “गिरीश नावाच्या माणसाला तू बोल, आपण त्यांच्याकडून पैसे काढू,’ असे म्हणून पायलने तिच्या फोनवरून गिरीश याच्यासोबत बोलायला लावले. ९ सप्टेंबर रोजी पीडितेचा वाढदिवस होता. लल्ला इंगळे तिला म्हणाला की, तुझा वाढदिवस माझ्या घरी साजरा करू. त्यामुळे ती लल्ला याच्या घरी गेली होती. त्यांनी तिला वाढदिवस करण्यासाठी दुसऱ्या मामीच्या घरी विमलाबाईचा वाडा हरिहर पेठ येथे नेले. रात्री बारानंतर वाढदिवस केला. लल्ला व बंटी हे दारू पिले. त्यांनी पीडितेला जबरदस्तीने सॉफ्ट ड्रिंक म्हणून बिअर पाजली. तेथे बंटी व लल्लाने अत्याचार केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article